ऑनलाईन फसवणूक करणारे दोघे जेरबंद

Sep 13, 2024 - 10:00
 0
ऑनलाईन फसवणूक करणारे दोघे जेरबंद

रत्नागिरी : सुरत येथून बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून आणि क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सिम कार्ड क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करून फसवणूक करणाऱ्या आणखी दोघांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

एआरके लर्निंग ग्रुप या व्हॉटस ॲप ग्रुपच्या सहाय्याने फिर्यादी यांना मोबाईलवर मॅसेज पाठवून एआरके इनव्हेसमेंट ग्रुप या कंपनीत जास्तीत गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत २४ लाख ८५ हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती. याबाबत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी यापुर्वी नीरज जांगरा आणि नारायणलाल जोशी या दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी जिम्मीभाई सुनीलभाई भगत वय ४० रा.सुरत आणि सोनू रामलाल टेलर वय २४ रा.टेलर यांना अटक केली आहे. या आरोपींनी क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यक्तीच्या बॅंक खात्याचा वापर करून त्या खात्यात पैसे गोळा केले. हि कारवाई निरीक्षक नितीन भोयर यांच्या सह दीपक गोरे, कृष्णा बांगर, वैभव ओहळ, रमिझ शेख, नीलेश शेलार आणि सौरभ कदम यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow