Bigg Boss Marathi Season 5 : आर्यानं निक्कीच्या कानाखाली मारल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

Sep 13, 2024 - 10:28
Sep 13, 2024 - 10:38
 0
Bigg Boss Marathi Season 5 : आर्यानं निक्कीच्या कानाखाली मारल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फुल्ल ऑन राडा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.निक्की आणि आर्यामधील वाद इतका पेटला की, आर्याने निक्कीच्या थोबाडीत पेटवली.

यानंतर निक्की रागाने बाहेर येत बिग बॉसकडे आर्याला घराबाहेर काढायची मागणी करताना दिसली. यादरम्यान, आता प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीकडे खास मागणी केल्याचं दिसत आहे.

आर्याने निक्कीच्या कानाखाली काढलाय जाळ

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये झटापट झाली. जादूई मोतीच्या टास्कमध्ये बाथरुमध्ये निक्की आणि आर्या यांच्यात वाद झाला, त्याच रुपांतर झटापटीत झालं. या झटापतीत आर्याने निक्कीच्या कानाखाली लगावली. कालच्या भागात निक्की आणि आर्याचं भांडण आणि त्यानंतर निक्की रागाने बाथरुम एरियातून बाहेर पडताना दिसली, पण आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली, हे फुटेज दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे प्रेक्षक आता ते फुटेज दाखवण्याची मागणी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow