अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; मुंबईत पार पडणार लग्नसोहळा

May 30, 2024 - 13:49
 0
अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; मुंबईत पार पडणार लग्नसोहळा

मुंबई : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

अनंत-राधिका येत्या 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. शाही थाटात मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या दिमाखदार लग्नसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. पारंपारिक हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 12 ते 14 जुलैदरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडले.

कसा असेल अनंत-राधिकाचा लग्नसोहळा?

अनंत-राधिका यांचा लग्नसोहळा 12 ते 14 जुलैदरम्यान पार पडणार आहे. 12 जुलैला शुभविवाह पार पडेल. 12 जुलैला शुभा आशिर्वाद (Shubh Ashirwad) आणि 14 जुलैला मंगल उत्सव (Mangal Utsav) पार पडणार आहे. 12 जुलैसाठी पारंपारिक ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. तर 13 जुलैला इंडियन फॉर्मल असा ड्रेसकोड आहे. त्यानंतर 14 जुलैला भारतीय पेहराव ठेवण्यात आला आहे. अनंत-राधिकाचं लक्षवेधी वेडिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाही थाटात पार पडतंय दुसरं प्री-वेडिंग

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन 29 मे 2024 पासून करण्यात आलं आहे. लग्झरी क्रूजवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर पार पडणाऱ्या या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह जगभरातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. 29 मे ते 1 जूनदरम्यान फ्रान्समध्ये अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. मनोरंजन, राजकारण, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आणि लग्नाला हजेरी लावणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow