राजापूर एसटी आगारात सार्वजनिक गणेशोत्सव

Sep 13, 2024 - 10:26
Sep 13, 2024 - 10:29
 0
राजापूर एसटी आगारात सार्वजनिक गणेशोत्सव

राजापूर : एसटी. चालक-वाहक, कर्मचारी यांनी राजापूर आगारात सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. गेली ३५ वर्षे ही परंपरा ते जपत आले आहेत. या निमित्ताने नेहमी सेवा बजावणाऱ्या आगारातील अधिकारी, चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांना विघ्नहर्त्या गणेशाची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळाली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने एसटी सेवा अत्यंत महत्वाची
मानली जाते. खाजगी गाड्यांची संख्या वाढलेली असली तरीही वाहतुकीसाठी एसटीचे महत्व कमी झालेले नाही. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी अनेक प्रवासी एसटीलाच प्रथम पसंती देतात. ही सेवा सुरू ठेवणारे चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी यांना नोकरीनिमित्त कायमच घराबाहेर राहावे लागते. अनेकवेळा सेवेत रूजू असलेल्या कर्मचाऱ्यांना घरी आलेल्या गणरायाची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी राजापूर येथील आगारातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून येथे गणेशोत्सव सुरु केला. या गणेशोत्सवासाठी येणारा खर्च एसटी कर्मचारी स्वतः वर्गणी काढून त्यामधून करतात. ही परंपरा येथील आगार व्यवस्थापक अजितकुमार घोसराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील कर्मचान्यांनी आजही कायम ठेवली आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी वरीष्ठ लिपीक लोमेश कोळेकर यांनी स्वः खचनि गणेशमूर्ती दिली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आगारप्रमुख घोसराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी, चालक-वाहक मेहनत घेत आहेत.

चालक वाहकांना सेवेची संधी
एसटीचे बालक, वाहक कर्तव्य बजावत असताना नेहमी घराबाहेर असतात. त्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येत नाही. मात्र राजापुर आगारत सार्वजनिक गणेशोत्सवामुळे त्यांना कर्तव्य बजावत गणरायाची सेवा करण्याची संधी मिळते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow