रत्नागिरी : 'खल्वायन'ची उद्या मासिक संगीत सभा

Sep 13, 2024 - 10:55
 0
रत्नागिरी : 'खल्वायन'ची उद्या मासिक संगीत सभा

रत्नागिरी : खल्वायन रत्नागिरी या संस्थेची ३०५ वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १४) सायंकाळी सात ते नऊ यावेळेत सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

ही मैफल पं. अजय पोहनकर यांच्या पट्टशिष्य व प्रसिद्ध गायक धनंजय जोशी (नांदेड) यांच्या शास्त्रीय तसेच अभंग, नाट्यपदांनी रंगणार आहे. मैफलीला साथसंगत तबलावादक हेरंब जोगळेकर, संवादिनी चैतन्य पटवर्धन, ऑर्गन श्रीरंग जोगळेकर, पखवाज मंगेश चव्हाण तर तालवाद्य वर्धन ओळकर करणार आहेत. संगीत प्रेमींनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow