खेडनजीक ७ लाख ३३ हजारांचा गांजा जप्त

Sep 13, 2024 - 10:55
Sep 13, 2024 - 10:57
 0
खेडनजीक ७  लाख ३३ हजारांचा  गांजा जप्त

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाजवळील एका हॉटेलसमोर मोटारीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित तरुणाला पोलादपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. मंगेश मधुकर भिलारे (२७, रा. गुरेघर, महाबळेश्वर) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे साडेचोवीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ११) रात्री उशिरा पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावाजवळी एका हॉटेलजवळ बुधवारी एक चारचाकी उभी होती. या वेळी अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला संशयित विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या (रा. शाहूनगर, पाचगणी, जि. सातारा) याने पोलिसांची चाहूल लागताच तो गाडीची चावी घेऊन पळून गेला. पोलिसांनी गाडीची पाहणी केली. त्या गाडीत २४ किलो ४३५ ग्रॅम वजनाचा सुमारे ७ लाख ३३ हजार ५० रुपये किमतीचा गांजा गोणीमध्ये आढळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow