चाकरमानी गणेशभक्तांच्या परतीसाठी देवरूख एसटी आगार सज्ज

Sep 14, 2024 - 16:41
 0
चाकरमानी गणेशभक्तांच्या परतीसाठी देवरूख एसटी आगार सज्ज

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी संगमेश्वर तालुक्यात आलेल्या गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी देवरूख एसटी आगारातून ३०० जादा बसेस सुटणार आहेत.

दि. १२ सप्टेंबर रोजी २० जादा बसेस सोडण्यात आल्या. १३ तारखेला १०९ गाड्या सोडण्यात आल्या. १४ तारखेला ११४ व रविवारी १५ तारखेला ४० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार प्रमुख हनुमंत फडतरे यांनी दिली.

गावागावात ग्रुप बुकिंग झाले असून जादा गाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे. जादा आलेल्या गाड्या साडवलीच्या माळरानावर लावून ठेवण्यात आल्या होत्या. प्रमुख मार्गावर आगाराचे तांञिक कर्मचारी तैनात होते. आलेल्या चालक-वाहकांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. गाड्या पार्किंगच्या ठिकाणीही तांत्रिक कर्मचारी तैनात होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow