रत्नागिरी : जिल्ह्यात आज २ हजार ८६३ दहीहंड्या फुटणार

Aug 27, 2024 - 09:45
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात आज २ हजार ८६३ दहीहंड्या फुटणार

रत्नागिरी : जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. आज दहीकाला उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्हयात यावर्षी २५१ सार्वजनिक तर २,६१२ खासगी दहीहंडया उभारण्यात येणार आहेत. 

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रूपये किंमतीची बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुवयास मिळणार आहे.

जिल्ह्यात गतवर्षी (२०२३) ३०९ सार्वजनिक तर ३,०४३ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या दहीहंड्यांमध्ये घट झाली आहे. जिल्हयात उभारण्यात येणाऱ्या विविध शहरातील सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्हयातील पथकांसह जिह्याबाहेरची पथकेही येतात. सध्या दहीहंडयांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा लागली आहे. दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून सिनेकलाकार, वाहिन्यांचे कलाकार, ऑर्केस्ट्रा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक दहीहंडया जयगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow