कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहात सामंजस्य करार

Aug 26, 2024 - 12:22
 0
कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहात सामंजस्य करार

त्नागिरी : एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धन केंद्रासाठी येथील एम. डी. नाईक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करार झाला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात बोलताना श्री.

सामंत म्हणाले, कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार होणार आहे. उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा होईल. टाटा समूहाबरोबर सामंजस्य करार करून २०० कोटी रुपये खर्चून रत्नागिरीत सेंटर होत आहे. ही परवानगी टाटा समूहाच्या मॅनेजमेंटने दिली आहे. महाराष्ट्रातील हा पहिला कार्यक्रम आहे. नवीन टेक्नॉलॉजी वापरून ही इमारत उभारण्यात येणार आहे. एकूण प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के खर्च महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे अभियांत्रिकी, रासायनिक व फळप्रक्रिया करणारे उद्योग आहेत. या औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा करणे, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार करणे तसेच रोजगार क्षमता वाढविणे आणि एमएसईना पाठिंबा देणे याकरिता कौशल्यवर्धन प्रशिक्षण केंद्र उभारणे येत आहे.

कुशल मनुष्यबळाची तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, स्थानिक कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती, उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल उपलब्ध करणे, स्थानिक रोजगार क्षमता वाढवणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या सेंटरद्वारे पाठिंबा देणे या हेतूने हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, टाटा टेक्नॉलॉजीसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पी. व्ही. कौलगुड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, शिरगाव सरपंच फरिदा काझी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाआधी एमआयडीसी व टाटा उद्योग समूह संचालित कौशल्यवर्धिनी केंद्राचे भूमिपूजन झाडगाव एमआयडीसीच्या प्लॉट क्र. १९५ वर करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow