हातखंबा येथील ढाब्याजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या करबुडेतील प्रौढाचा मृत्यू

Aug 17, 2024 - 14:07
 0
हातखंबा येथील ढाब्याजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या करबुडेतील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या हातखंबा येथील एका ढाब्याजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. संतोष सखाराम वेद्रे (वय ४५, रा. करबुडे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. 

ही घटना ४ ऑगस्टला रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow