लांजात जि. प. शाळेचा शैक्षणिक कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती

Sep 16, 2024 - 12:33
Sep 16, 2024 - 12:39
 0
लांजात जि. प. शाळेचा शैक्षणिक कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती

लांजा : लांजा तालुक्यात मराठी शाळांमधली घटती पटसंख्या चिंताजनक असल्याची ओरड सुरू आहे. यासह लांजा तालुक्याचा शैक्षणिक कारभार गेली अनेक महिने प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरु आहे.

शैक्षणिक दर्जा अधिक सुदृढ बनवायचा असेल तर अनेक दिवस रिक्त असलेले गटविकास अधिकारीपद त्वरित भरणे गरजेचे आहे. शैक्षणिक कारभार प्रभारी सोपवला तर शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल असा प्रश्न सर्वसामान्य पालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत. शासनाने सुगम आणि दुर्गम निकष लावून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या चुटकीसरशी केल्या. मात्र रिक्त आणि प्रभारी असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचे ओझे मात्र तसेच ठेवले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक पदे आज रिक्त असल्याने त्याची जबाबदारी प्रभारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपवून प्रशासनाने हात झटकण्याचे काम केले आहे.

लांजा तालुक्यामध्ये एकूण २१७ जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत. शाळांची संख्या जास्त असताना काही ठिकाणी आवश्यक असणारे मुख्याध्यापक पदच नाही. यासह तालुक्यांमध्ये केंद्रप्रमुखांची
एकूण २१ पदे आवश्यक असताना त्यातील ११ पदे कार्यरत आहेत.

शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून चार पदे आवश्यक असताना तीन कार्यरत असून, दोघांपैकी एकाकडे रत्नागिरी शिक्षण विभागाचा अतिरिक्त भार दिला गेला आहे. दुसरा एकजण लांजा विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे दोन तालुक्यांच्या जबाबदारीत एक अधिकारी अडकल्याचे दिसून येते. लांजा तालुक्याचे मुख्य गटशिक्षण अधिकारी पद गेली अनेक महिने प्रभारी कार्यभारात अडकले आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात पाचच केंद्रप्रमुख
२१७ शाळांसाठी एकूण २१ केंद्रप्रमुखांची गरज असताना फक्त पाच केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. यातील काही केंद्रप्रमुख पुढील काही महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आवश्यक केंद्रप्रमुखच नसतील तर शाळांचा शैक्षणिक दर्जा चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow