सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन विकास करू : आ. शेखर निकम

Sep 5, 2024 - 14:24
 0
सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन विकास करू : आ. शेखर निकम

संगमेश्वर : सर्व जातीधर्माच्या लोकांना साधीला घेऊन चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले, तसेच मतदारसंघात १४०० कोटींपेक्षा जास्तीचा निधी मंजूर करून कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

संगमेश्वर तालुक्यातील चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा शांत, संयमी आमदार म्हणून निकम हे मतदार संघात परिचित आहेत, असे चिखली दहागाववासीयांनी सांगितले. या प्रसंगी आमदार निकम म्हणाले, गेल्या दहा वर्षामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण न करता सर्वांना एकत्रित घेऊन सर्व जातीधर्मातील लोकांच्या अडीअडचणी व मतदार संघातील जटील प्रश्न लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा केला आहे. विविध प्रश्न अधिवेशनात मांडत ते कसोशीने सोडवले आहेत. आतापर्यंत केलेला वाडीवस्त्यांतील नियोजनबद्ध विकास आणि कोणताही अडचण लिलया सोडवली आहे.

या वेळी आमदार निकम यांनी चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळाशी चर्चा केली. त्यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या पुढील काळात कशा सोडवण्यात येतील याबाबत मार्गदर्शन केले.

सर्व समस्या नक्कीच सोडवू, असा विश्वासही दिला. या वेळी अध्यक्ष सिद्धार्थ सावंत, उपाध्यक्ष भगवान कदम, अनंत कदम, हरिश्चंद्र पवार, चिंतामणी कदम, विनायक मोहिते, संदीप कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow