रत्नागिरी : १ जुलैपासून सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण

Jun 18, 2024 - 13:47
Jun 18, 2024 - 13:53
 0
रत्नागिरी :  १ जुलैपासून सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमार युवकांसाठी सहा महिने मुदतीचा सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम १ जुलैपासून सुरू होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी युवकांनी २८ जूनपर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पेठकिल्ला, ता. जि. रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधी १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२४ (६ महिने) असणार आहे. यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. (आधार कार्ड व रेशन कार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छीमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.

(विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावयाची आहे. प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह रु.४५०/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. २७००/- मात्र तर दारिद्र रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु. १००/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.६००/- मात्र असेल. (दारिद्र रेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी पं. स. सांचा दाखला जोडावा).

राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेऊन मच्छीमारी नौका बांधता येतील. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकते. अधिक माहितीसाठी जी. द. सावंत, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, पेठकिल्ला, रत्नागिरी, ता. व जिल्हा रत्नागिरी, पिन ४१५६१२. ईमेल :- ftcrtngmail.com 'mo-mBob d whatsapp क्रमांक ९४२२३७१९०१ येथे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow