गुहागर : 'मनसे'तर्फे गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी मोफत बससेवा

Sep 16, 2024 - 16:52
 0
गुहागर : 'मनसे'तर्फे गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी मोफत बससेवा

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मोफत एस.टी. सेवा उपलब्ध करून दिली आहे. ही बस कॉंढर काळसूर येथून सोडण्यात आली. गुहागर तालुक्यातील अनेक प्रवाशांनी या मोफत बसचा लाभ घेतला. 

मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बस सोडण्यात आली. यावेळी बस चालक यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व प्रवाशांच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, कौंडर काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
  
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow