रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे खेळाडू भारताकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

Jun 7, 2024 - 10:02
Jun 7, 2024 - 10:53
 0
रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे खेळाडू भारताकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

रत्नागिरी : दि. ०७ जून २०२४ ते १० जून २०२४ चीन येथे होणाऱ्या जागतिक लेझर रन चॅम्पियन शिप (world laser run  champion ship ) स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महेश मिलके स्विमिंग ग्रुप चे सात खेळाडू बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले असून ते वीस तासांचा प्रवास करून गुरुवारी चीन येथे पोहोचले आहेत. 

महेश मिलके स्विमिंग ग्रुप चे खेळाडू -(१) कु. करण महेश मिलके. (२) कु. तनया महेश मिलके. (३)कु. आर्यन प्रशांत घडशी. (४)कु. आयुष अजय काळे. (५) कु. कार्तिकी प्रकाश भुरवणे. (६)कु. निधी शरद भिडे. (७)कु. मीरा प्रकाश भुरवणे. हे खेळाडू त्या त्या वयोगटात जागतिक लेझर रन स्पर्धेसाठी रवाना झाले असून सदर सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण श्री. महेश शंकरराव मिलके सर व त्यांची पत्नी सौ. गौरी महेश मिलके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करण्याकरिता गेले असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दोन वर्षांपूर्वी महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंची पोर्तुगल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली परंतु विझा न मिळाल्याने भारतातील खेळाडूंना ही स्पर्धा खेळता आली नव्हती. तरी महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंची ही आंतरराष्ट्रीय भरारी ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी तसेच महाराष्ट्र, साठी  गर्वाची गोष्ट आहे, असे तमाम पालक वर्ग तसेच रत्नागिरी वासियांतून बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow