रत्नागिरी : 'कोकण पदवीधर'च्या निवडणुकीत ११ वाजेपर्यंत २०.१५ % मतदान

Jun 26, 2024 - 01:02
Jun 26, 2024 - 14:02
 0
रत्नागिरी : 'कोकण पदवीधर'च्या निवडणुकीत ११ वाजेपर्यंत २०.१५ % मतदान

त्नागिरी : कोकण पदवीधर मतदार संघासाठी सुरु झालेल्या मतदानामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २०.१५ टक्के मतदान झाले आहे.

भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रमुख लढत आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत मतदार संघात ७.३० टक्के इतके मतदान झाले होते. तर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदार संघात २०.१५ % इतके मतदान झाले होते. त्यामध्ये समाविष्ट पालघरमधे १७.३३%, ठाणे जिल्ह्यात २०.५९ %, रायगड जिल्ह्यात १९.८३ %, तर सिंधदुर्ग जिल्ह्यात २४.१७ % मतदान झाले आहे.

तर याच निवडणूक प्रक्रियेतील मुंबई पदवीधर मतदार संघासाठी ११ वाजेपर्यंत २७.०१% तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १८.३१% मतदान पार पडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow