रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात १० डॉक्टर वर्षाच्या करारावर

Jun 7, 2024 - 12:28
Jun 7, 2024 - 12:32
 0
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात १० डॉक्टर वर्षाच्या करारावर

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील आरोग्ययंत्रेला लवकरच नवा बूस्टर मिळणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४४६ पदांगण रुग्णालयातील जिल्हा विविध विभागातील ९८६ पदे भरण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. जुलैअखेर टप्प्याटप्याने हे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे, तसेच वर्षाच्या करारावर १० वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडले आहे. सर्वसामान्यांना योग्य उपचार मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ करणारी ही यंत्रणा आहे; परंतु प्रथम श्रेणीतील सर्जन आणि द्वितीय श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९० टक्केच्यावर पदे रिक्त आहेत.

त्यामुळे आरोग्यसेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरही प्रचंड ताण पडत आहे: परंतु जिल्हा रुग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित आले आहे. त्यामुळे हळूहळू सुधारण होताना दिसत आहे. एकूणच या दयनीय परिस्थितीबाबत अधिष्ठाता रामानंद म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती समाधानकारक नाही; परंतु काहीशी सुधारली आहे. हाडाचे डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ प्रयोगशाळेत तीन वैद्यकीय अधिकारी मिळाले. २ खासगी भूलतज्ज्ञ घेण्यात आले आहेत. मनुष्यबळ जोवर वाढत नाही तोवर ही परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या एकूणच आरोग्यव्यवस्थेबाबत कळवले आहे. जिल्हा रुग्णालयाला ९८९ मनुष्यबळ मिळावे यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.

रुग्णालयात १० कोटीची विकासकामे
जिल्हा रुग्णालयालाही दहा कोटींचा निधी मिळाला आहे. तेथे अधिष्ठातांच्या सुसज्ज दालनासह अनेक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी धर्मशाळेचेही बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा रुग्णालयाचा कॅम्पस सुंदर दिसेल, अशी अपेक्षा अधिष्ठातांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 07/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow