महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला, आता कॅबिनेटमंत्री करा : रामदास आठवले

Jun 7, 2024 - 15:10
Jun 7, 2024 - 15:11
 0
महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला, आता कॅबिनेटमंत्री करा : रामदास आठवले

मुंबई : लोकसभा निवडणुकीची निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे इतर एनडीएतील सहकारी पक्षांच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन करावे लागणार आहे.

दरम्यान, एनडीएतील घटक पक्षांनी भाजपकडे आपल्या मागण्यांची यादी वाचण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही मागणी करताना आखडता हात घेतलेला नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपकडे काही मागण्या केल्या आहेत.

काय म्हणाले रामदास आठवले ?

"महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला. यावेळी मला कॅबिनेट मंत्री मिळाले पाहिजे. त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे", असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सध्या सरकारही बनलेले नाही. मात्र, मंत्रिपदावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणते मंत्रालय हवे? यावरुनही मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत. एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सध्या 240 सीट आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीकडे 16, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 7 जागा आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) कडे 5 जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापन केल्यानंतर कोणाला किती जागा मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow