खेड : दुचाकीस्वार मृत्यूप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा
खेड : तालुक्यातील गुणदे तलारीवाडी येथील राकेश रमेश माने (वय २७) तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अज्ञात अवजड वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ मे रोजी पहाटे साईरले एक्सल फाटा ते पिरलोटे बाजूच्या दरम्यान घडली होती. फौजदार उदय संभाजी भोसले यांनी या अपघाताची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात ५ जूनला दिली आहे. तालुक्यातील गुणदे-तलारीवाडी येथील राकेश रमेश माने हा ३१ मे रोजी पहाटे दुचाकीने पिरलोटे बाजूकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून अज्ञात अवजड वाहनाने त्याला धडक दिली. यामध्ये राकेश माने हा मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 07-06-2024
What's Your Reaction?