रत्नागिरी : घरात झोपलेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

Jun 10, 2024 - 11:16
 0
रत्नागिरी : घरात झोपलेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथे घरात झोपलेल्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञाताने लांबवले. ही घटना शुक्रवार, ७ जून रोजी पहाटे २.४५ वा. घडली. 

याबाबत सुफिया अब्बास बुड्ये (७५, रा. राजिवडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी त्या घरात झोपलेल्या असताना घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून आत शिरत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील २६.५८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow