खेड : जगबुडी नदीच्या गाळमुक्तीसाठी २.८४ कोटींची मान्यता

May 25, 2024 - 13:52
May 25, 2024 - 14:05
 0
खेड : जगबुडी नदीच्या गाळमुक्तीसाठी २.८४ कोटींची मान्यता

खेड : येथील जगबुडी नदी गाळाने भरली असून, त्यामुळे पावसाळ्यात नदी किनाऱ्यावरील भागात वसलेल्या खेड शहराला व काही गावांना पुराचा फटका बसतो; मात्र पाटबंधारे विभागामार्फत नदीतील गाळ व बेटे काढण्यासाठी सादर करण्यात आलेल्या २ कोटी ८४ लाख ९७२ रुपये एवढया खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाटबंधारे विभागाच्या अलोरे कार्यालयाला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

खेड शहराला २२ ते २३ जुलै २०२१ या कालावधीत जगबुडी नदीला आलेल्या महापुराचा फटका बसला होता. त्याचे प्रमुख कारण गाळ हेच होते. अनेक वर्षांपासून तयार झालेल्या गाळाच्या बेटांमुळे अडून पुराचे पाणी शहरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये शिरून महापूर आला होता. या परिस्थितीनंतर आमदार योगेश कदम यांनी तातडीने बैठक घेऊन व्यापारी, नागरिक व अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. खेड नगरपालिका, नागरिकांनी व अशासकीय सेवाभावी संस्था यांनी जगबुडी नदीपात्रातील गाळ काढणे आवश्यक असल्याबाबतचे निवेदन जलसंपदा व महसूल विभागाला दिली
होती. जगबुडी व तिच्या उपनद्यांच्या क्षेत्राची पाहणी करून क्षेत्रीय स्तरावर सविस्तर गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार करून जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (यांत्रिकी) यांना सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास त्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. जगबुडी नदीमधील गाळ व बेटे काढण्यासाठी २ कोटी ८४ लाख ९७२ रुपये एवढ्या खर्चाच्या यांत्रिकी विभागाने दिलेल्या अंदाजपत्रकास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पाटबंधारे यांत्रिकी विभाग अलोरेमार्फत जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे काम तत्काळ सुरू करावे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 25/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow