संगमेश्वर : करंबेळे ते कोसुंब ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था

May 25, 2024 - 16:20
May 25, 2024 - 16:21
 0
संगमेश्वर : करंबेळे ते कोसुंब ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे मैल दगड (आदर्शनगर) ते कोसुंब पातळीवाडी या ग्रामीण मार्गाची अवस्था दयनीय बनली आहे. हा मार्ग पूर्णत उखडल्यामुळे पावसाळ्यात या मार्गवरील वाहतूक धोकादायक बनणार आहे या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे.

संगमेश्वर देवरुख या मार्गाला जोडणारा हा ग्रामीण मार्ग आहे गेली दोन वर्षे या मार्गावर अनेक ठिकाणी पूर्णत रस्ता उखडला गेला आहे. डांबराचा थर जाऊन अगदी मजबूतीकरणाचे मोठे दगडही रस्त्यावर इतस्ततः पसरले आहेत, आता अनेक ठिकाणी फक्त रस्त्यावरील माती शिल्लक राहिली आहे, या मार्गावरून पातळीवाडी, कातळवाड़ी या वाडीतील प्रवास करतात.

या रस्त्याची सातत्याने दुरुस्ती करण्याची मागणी, आठवण करूनही ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. या मार्गावरील ६०० मीटर रस्ता डांबरीकरणाची मागणी वर्षभर करुनही पूर्ण होऊ शकत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 25/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow