रवी राणामुळेच नवनीत राणा पडणार.. : बच्चू कडू

May 25, 2024 - 16:27
 0
रवी राणामुळेच नवनीत राणा पडणार.. : बच्चू कडू

मुंबई : सट्टा बाजारात भाव कोणाचेही असू द्या, अमरावती लोकसभेला आम्हीच बाजी आम्हीच मारू, असा आत्मविश्वास प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेचा निकाल आमच्याच बाजूने राहील, मतपेटीचा भाव आमचाच राहिलं, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, अमरावीमधील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावरूनही बच्चू कडू यांनी जोरदार 'प्रहार' केला. रवी राणा मुळेच नवनीत राणा पडणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

बच्चू कडू म्हणाले की, लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार आहे.. रवी राणामुळेच नवनीत राणा अमरावती लोकसभेला पडणार आहेत. दोन वर्षे जर रवी राणा चूप राहिला असता, तर आज चित्र वेगळं राहिलं असतं, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.

पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी पुण्यातील अग्रवाल प्रकरणावर भाष्य केलं. अशा पद्धतीने अंदाधुंद वाहन चालवलं किंवा वाईट होताना दिसत असेल. डान्सबार पबसारखे प्रकार बघितले. तर त्यात जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहे. ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार जास्त आहे अशी परिस्थिती आहे, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:55 25-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow