नारदखेरकी-देवखेरकी रामपूर रस्त्याची दुरवस्था

Jun 10, 2024 - 11:53
 0
नारदखेरकी-देवखेरकी रामपूर रस्त्याची दुरवस्था

रामपूर : नारदखेरकी - देवखेरकी ते रामपूर एस.टी स्टँडपर्यंत १२ किलोमीटरचा पंतप्रधान ग्राम सडक योजना मधून रस्ता तयार केला. परंतु, त्याच्यावर फक्त मातीचा भराव टाकला. त्यानंतर डांबरीकरण केला नसल्याने पावसामुळे रस्ता चिखलमय बनून येथे वारंवार अपघात घडत आहेत. 

मान्सून पाऊस सुरू झाला. रस्त्यावर पावसामुळे संपूर्ण चिखलमय साम्राज्य तयार झाले आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. याला सार्वजनिक बांधकाम खाते जवाबदार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माने यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र, या रस्त्याच्या स्थितीची जाणीव करून दिली. तरीसुद्धा अजिबात लक्ष देत नाहीत. संपूर्ण रस्त्यावर खडी टाकून रस्ता पावसाळ्याच्या वाहतुकीस योग्य करावा; अन्यथा तीन ते चार गावांची दळणवळण चार महिने होणार नाही. तातडीने रस्त्यावर खडी टाकून चिखल होणार नाही. याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. चिखलामुळे अपघात होत असून रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow