हॉटेलच्या काऊंटरवर ठेवलेला मोबाईल गेला चोरीला

May 30, 2024 - 10:23
 0
हॉटेलच्या काऊंटरवर ठेवलेला मोबाईल गेला चोरीला

रत्नागिरी : तालुक्यातील ढोकमळे कोतवडे येथील हॉटेलच्या काउंटरवरील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञाताने लांबवला. ही घटना रविवार, २६ मे रोजी रात्री ८ वा. घडली. 

याबाबत आसावरी देवेंद्र वणजू (रा. मारुती आळी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री त्यांनी आपला मोबाईल ढोकमळे-कोतवडे येथील हॉटेल दर्या आस्वादच्या काउंटरवर ठेवलेला होता. तो अज्ञाताने लांबवला. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी आजुबाजुला शोध घेउन मंगळवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow