फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये पदवीदान समारोह

Jun 10, 2024 - 10:36
Jun 10, 2024 - 12:36
 0
फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये पदवीदान समारोह

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच झाला.

या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून आशिष कीर, प्रमुख अतिथी म्हणून सौम्या चक्रवर्ती उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी मान्यवरांची स्वागत केले. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी आणि एम.सी.ए. अशा विविध अभियांत्रिकी शाखांच्या सुमारे १७० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शना बापट यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. प्रल्हाद सोमण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रसन्न साठे आणि सहकारी प्राध्यापकांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow