चिपळुणात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांतर्फे २५ वा वर्धापनदिन साजरा

Jun 11, 2024 - 10:13
Jun 11, 2024 - 10:31
 0
चिपळुणात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांतर्फे २५ वा वर्धापनदिन साजरा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा २५ वा वर्धापन दिनानिमित्त कामथे कुटीर रुग्णालय येथे फळवाटप करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे संपर्क कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला. प्रथमच चिपळुणात दोन वेगवेगळ्या गटांतर्फे वर्धापनदिन साजरा झाला.

यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम तसेच प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांनी पक्ष वर्धापन दिनानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सचिव सुधीर भोसले, युवक अध्यक्ष निलेश कदम, जिल्हा महिला उपाध्यक्ष रवीना गुजर, युवक उपाध्यक्ष प्रतीक सुर्वे, शहर सचिव मनोज जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वहाब सुर्वे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोमवारी चिपळुणातील संपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम आणि पक्षाचे नेते प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ सल्लागार सतीश खेडेकर, माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, सुतार समाजाचे नेते वासुदेव सुतार, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, तालुका उपाध्यक्ष शमून घारे, शहराध्यक्ष रतन पवार, अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष महंमद पाते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow