रस्त्याबाजूच्या गटारात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणाचा मृत्यू
![रस्त्याबाजूच्या गटारात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणाचा मृत्यू](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_666403cdc602b.jpg)
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव ते हातखंबा या रस्त्याच्या बाजूच्या गटारात बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार ६ जून रोजी रात्री ८ वा. घडली.
तेजस रामचंद्र जाधव (२८, कातळवाडी पालगड, दापोली) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास तो कुवारबाव ते हातखंबा जाणाऱ्या चढावाच्या रस्त्याच्या गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. तेथील नागरिकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेजसला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 08-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)