चिपळूण न.प. ची धोकादायक इमारत रिकामी करण्यास सुरुवात

Jun 11, 2024 - 11:49
 0
चिपळूण न.प. ची धोकादायक इमारत रिकामी करण्यास सुरुवात

चिपळूण : येथील नगर परिषदेच्या इमारत मोडकळीस आली आहे. ती धोकादायक बनली आहे. या इमारतीतील साहित्य हटवून संपूर्ण इमारत रिकामी केली जाणार आहे. नगर परिषदेच्या मुख्य इमारतीत हे साहित्य स्थलांतरित केले जात आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या मुख्य इमारतीवर अधिक भार वाढणार आहे.

चिपळूण नगर परिषदेची ब्रिटिशकालीन इमारत जुनी झाली आहे. नगरपरिषद मुख्य इमारत दगडी बांधकामाची आहे. तसेच मागील बाजूस उप इमारत असून, त्या इमारतीचे बहुतांशी बांधकाम ढासळले आहे. अनेक ठिकाणी बांधकाममधील सळ्या बाहेर पडलेल्या दिसून येत आहेत. या इमारतींचा काही भाग ढासळू लागला आहे. त्यातच अनेक विभागात पावसाळ्यात गळती लागत असून, परिसर ओला होत आहे. लाकडी जिनाही हलत आहे. गतवर्षी मुख्य इमारतीची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परंतु उप इमारत दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. त्यासाठी नगर परिषदेने या इमारतीसमोर 'सावधान धोकादायक इमारत' असा फलक नुकताच उभारला आहे.

त्यानंतर आता नगर परिषदेने या धोकादायक इमारतीतील साहित्य हटविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी या इमारतीतील बहुतांशी साहित्य मुख्य इमारतीत स्थलांतरित केले. तसेच या इमारतीत नागरिकांना व पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करायला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांमधून नवीन आराखड्याप्रमाणे इमारत बांधकाम तातडीने करण्यात यावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow