रांगोळीकार विलास रहाटेनी रांगोळीतून साकारले फराळाचे ताट

देवरूख : शहरातील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत. या दिवाळीनिमित्त त्यांनी रांगोळीतून फराळाचे ताट साकारले आहे. हुबेहूब फराळातील पदार्थ दिसणाऱ्या या रांगोळीचे देवरूख तालुक्यात कौतुक होत आहे.

या ताटात त्यांनी दिवाळीला करण्यात येणाऱ्या सगळ्या फराळाचे पदार्थ रांगोळीतून साकारले आहेत. लाडू, चकल्या, करंज्या, शेव हे पदार्थ त्यासोबतच ताट, वाटी व चमचा देखील साकारला आहे. ही रांगोळी इतकी सजीव वाटते की ती रांगोळी आहे की, खऱ्या फराळाचे ताट हे पाहणाऱ्यांना देखील संभ्रम पडावा. इतका आहे. राहाटे यांनी आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. त्यांनी साकारलेल्या रांगोळ्या खूपच मनमोहक असून, त्यांची मोठ मोठ्या नेत्यांचे चित्र रांगोळीतून साकारण्याची खासीयत आहे. यासाठी त्यांना संपूर्ण देशात मागणी असते.

त्यांच्या रांगोळीची नोंद लिम्का बुकमध्ये देखील करण्यात आली आहे. याचबरोबर रंगसंगतीतील कलाकृती, पाण्यावरील रांगोळी, माती कामातून कलाकृती साकारणे यातही त्यांनी मोठे नावलौकिक प्राप्त केले आहे. त्यांनी साकारलेल्या रांगोळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 02/Nov/2024

Tata sierra