महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथे ‘वाचन पायऱ्यांवर’ अनोखा उपक्रम

रत्नागिरी: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र गजानन देव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक आगळावेगळा ‘वाचन पायऱ्यांवर’ अनोखा उपक्रम” आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात BCA विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर बसून पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. उपक्रमादरम्यान प्रत्येक पायरीवर प्रेरणादायी घोषवाक्ये लावण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थिनींमध्ये वाचनाची उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण झाली. विद्यार्थिनींनी ग्रंथालयातून विविध पुस्तके निवडून शांत व शिस्तबद्ध वातावरणात वाचन केले.

या उपक्रमाला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम प्र-प्राचार्या. स्नेहा कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रंथपाल डॉ. सुमित कानफाडे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड वाढीस लागली असून वाचन संस्कृतीला चालना मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 23-04-2026