रत्नागिरी नगरपालिकेतर्फे छंदवर्गाचे आयोजन

रत्नागिरी : नगरपालिका आणि महिला व बाल कल्याण समिती यांच्या वतीने छंद वर्गाचे आयोजन शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे.

याचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, आफ्रिन होडेकर, रुक्सार खान, जागृती पिलणकर, निवेदिता कळंबटे, फौजिया मुजावर यांचा हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला कुंभार काम कागदकाम बागकाम व्यक्तिमत्व विकास असे विविध प्रकार या छंद वर्गात घेण्यात येणार आहे. ३०० विद्यार्थ्यांनी या छंद वर्गात सहभाग घेतला आहे. छंद वर्ग २४ ते २८ एप्रिल या कालावधीत असणार आहे.

या छंद वर्गात दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे, किल्ला शाळेचे मुख्याध्यापक संदीप कांबळे, कागदकाम मार्गदर्शक दीप्तेश पाटील, अनन्या कीर, ओंकार लोध आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 24-04-2026