रत्नागिरी : मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या आदेशाने नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. नितीन सरदेसाई आणि श्री. शिरीष सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रत्नागिरीची प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांची संघटनात्मक आढावा बैठक आज माळनाका रत्नागिरी येथे पार पाडली.
उपस्थितांना मान्यवर नेत्यांनी पक्ष संघटना बांधणी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मनसे नेते श्री. नितीन सरदेसाई, तसेच श्री शिरीष सावंत यांनी यापुढील काळात पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी योग्य ती पावले टप्प्याटप्प्याने उचलली जाणार असून जिल्ह्याला नवीन नेतृत्व देण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली असून यापुढील काळात जिल्ह्याच्या प्रत्येक तालुकानिहाय बैठकीचा आढावा घेऊन मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरेंना सादर केला जाणार असून त्यानंतर नवीन नेतृत्वावर पक्ष नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब केले जाईल असे सूचित केले.
सदर बैठकीस रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 25-04-2026














