निवळी मालपवाडी येथे परवाना नसताना दारू पिण्यास बसणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी मालपवाडी येथे दारू पिण्याचा परवाना नसताना दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वा. करण्यात आली.

राजेंद्र संभाजी मालप (३६, रा. निवळी मालपवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तो दारू पिण्याचा परवाना नसताना निवळी मालपवाडी येथे आपल्या समोर बिअरची बाटली घेउन बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 24-09-2024