FDA Ratnagiri Spice Raid: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; १ लाखांहून अधिकचा भेसळीचा मसाला जप्त

FDA Ratnagiri Spice Raid: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; १ लाखांहून अधिकचा भेसळीचा मसाला जप्त

चिपळूण, गुहागर आणि राजापूरमध्ये धाडी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा

रत्नागिरी:
FDA Ratnagiri Spice Raid च्या माध्यमातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जिल्ह्यात अत्यंत धडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत रत्नागिरी ग्रामीणसह चिपळूण, गुहागर आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी अचानक छापेमारी करत अन्न व औषध प्रशासनाने एकूण १ लाख ३७० रुपयांचा तब्बल ८४ किलो संशयास्पद व बेकायदेशीर मसाल्यांचा साठा जप्त केला आहे.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, या कारवाईदरम्यान वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणावर माल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

चिपळूण: १९ किलो मिक्स मसाला (किंमत २९,९२० रुपये)

Hotel star caters

गुहागर: २५ किलो मिक्स मसाला (किंमत ३६,२५० रुपये)

राजापूर: ३० किलो कुर्डी मसाला (किंमत २८,२०० रुपये)

रत्नागिरी ग्रामीण: १० किलो चटणी (किंमत ६,००० रुपये)

सर्वसामान्यांना व ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मसाले मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन सातत्याने कडक पावले उचलत आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या किंवा सुट्या मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या अनेक तक्रार प्राप्त झाल्यानंतर, प्रशासनाने सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर कडक निर्बंध घातले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करूनच अन्नपदार्थांची विक्री करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, या तीन तालुक्यांमध्ये नियमांचे खुलेआम उल्लंघन करून विनापरवाना व निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांची विक्री सुरू होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत ८४ किलो मसाल्यांचा साठा जप्त केला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ललित गायकवाड यांनी दिली आहे. सणाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे अन्नडात भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.