सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सुरत ते मंगळुरू दरम्यान धावणारी विशेष ट्रेन (०९०५७/०९०५८) आता कायमस्वरूपी (Regularize) करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ही गाडी ‘सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत एक्स्प्रेस’ (१९०५७/१९०५८) या नवीन क्रमांकासह आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
सुरतवरून ही सेवा ३ जून २०२६ पासून तर मंगळुरू जंक्शनवरून ४ जून २०२६ पासून सुरू होत आहे. यामुळे गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांना जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि हक्काचा होणार आहे.
२० डब्यांची संरचना
प्रवाशांच्या सुखावह प्रवासासाठी या गाडीला एकूण २० डबे असणार आहेत. यामध्ये २ टायर एसी (१ डबा), ३ टायर एसी (७ डबे), स्लीपर क्लास (६ डबे), जनरल (४ डबे) आणि एसएलआर/डी (२ डबे) अशी उत्तम सोय करण्यात आली आहे.
प्रमुख थांबे
ही गाडी उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी आणि सुरतकल या प्रमुख स्थानकांवर थांबेल.
असे असणार नवीन वेळापत्रक
गाडी क्रमांक आणि मार्ग – कधी सुटणार? – कधी पोहोचणार?
१९०५७ सुरत ते मंगळुरू जंक्शन – दर बुधवार आणि रविवारी संध्याकाळी ७:३५ वाजता – दुसऱ्या दिवशी रात्री ७:४५ वाजता
१९०५८ मंगळुरू जंक्शन ते सुरत – दर सोमवार आणि गुरुवारी रात्री १०:३० वाजता – दुसऱ्या दिवशी रात्री ११:४५ वाजता
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 30-05-2026














