कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव उत्साहात साजरा

कणकवली : दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 15 हजार दिव्यांनी कुणकेश्वर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. कुणकेश्वर मंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडीभोवती दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. या दीपोत्सवामुळे कुणकेश्वर मंदिर प्रकाशात उजळलं होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 04/Nov/2024

Tata motars punch