Team India Schedule 2026: IPL संपलं, आता टीम इंडिया आता आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सज्ज! अफगाणिस्तान ते इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक पाहा

नवी दिल्ली:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (RCB) रविवारी (३१ मे) गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि तब्बल दोन महिने चाललेल्या आयपीएल २०२६ चा (IPL 2026) दणदणीत समारोप झाला. मात्र, क्रिकेटप्रेमींनो, शांत बसायला अजिबात वेळ नाही! कारण अवघ्या एका आठवड्याच्या आत ‘मेन इन ब्लू’ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

येत्या ६ जून ते थेट डिसेंबर २०२६ पर्यंत भारतीय संघाचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त असून, संघ तब्बल ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा भारत दौरा, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांचे दौरे आणि बहुप्रतीक्षित आशियाई खेळांचा (Asian Games 2026) समावेश आहे.

६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध मोहिमेची सुरुवात

भारताच्या या व्यस्त हंगामाची सुरुवात मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. ६ ते २० जून दरम्यान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १ कसोटी आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. विशेष म्हणजे, न्यू चंदीगड येथे होणारा हा कसोटी सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) सायकलचा भाग नसेल.

टीम इंडियाचे संपूर्ण आंतरराष्ट्रीय वेळापत्रक (Team India All Schedule 2026):

१. अफगाणिस्तानचा भारत दौरा (मायदेशात)

  • ०६ – १० जून: एकमेव कसोटी सामना (न्यू चंदीगड)
  • १३ जून: पहिला वन-डे सामना (धरमशाला)
  • १७ जून: दुसरा वन-डे सामना (लखनऊ)
  • २० जून: तिसरा वन-डे सामना (चेन्नई)

२. भारताचा आयर्लंड दौरा

  • २६ जून: पहिला टी-20 सामना (बेलफास्ट)
  • २८ जून: दुसरा टी-20 सामना (बेलफास्ट)

३. भारताचा इंग्लंड दौरा (टी-२० आणि वन-डे मालिका)

  • ०१ जुलै: पहिला टी-20 सामना (चेस्टर-ली-स्ट्रीट)
  • ०४ जुलै: दुसरा टी-20 सामना (मँचेस्टर)
  • ०७ जुलै: तिसरा टी-20 सामना (नॉटिंगहॅम)
  • ०९ जुलै: चौथा टी-20 सामना (ब्रिस्टल)
  • ११ जुलै: पाचवा टी-20 सामना (साऊदॅम्पटन)
  • १४ जुलै: पहिला वन-डे सामना (बर्मिंगहॅम)
  • १६ जुलै: दुसरा वन-डे सामना (कार्डिफ)
  • १९ जुलै: तिसरा वन-डे सामना (लॉर्ड्स, लंडन)

४. भारताचा झिम्बाब्वे दौरा

  • २३ जुलै: पहिला टी-20 सामना (हरारे)
  • २५ जुलै: दुसरा टी-20 सामना (हरारे)
  • २६ जुलै: तिसरा टी-20 सामना (हरारे)

५. भारताचा श्रीलंका दौरा (ऑगस्ट २०२६)

  • वेळापत्रक: २ कसोटी (WTC चा भाग) आणि ३ टी-20 सामने (या मालिकेच्या अधिकृत तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत).

सप्टेंबर ते डिसेंबर: आशियाई खेळ आणि न्यूझीलंडचा तगडा दौरा

भारताचा २०२६-२७ चा घरचा हंगाम सप्टेंबरच्या शेवटी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होईल. त्यापूर्वी भारतीय संघ जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळात टी-२० स्वरूपात खेळताना दिसेल.

  • १७ सप्टेंबर – ०३ ऑक्टोबर: आशियाई खेळ २०२६, जपान (टी-२० फॉरमॅट)
  • २७ सप्टेंबर – ०२ ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका (३ सामने)
  • ०६ – १७ ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका (५ सामने)
  • २२ ऑक्टोबर – डिसेंबरअखेर: भारताचा न्यूझीलंड दौरा (२ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने)

बातमीचे ठळक मुद्दे (Quick Highlights):

  • आयपीएलचा शेवट: आरसीबीच्या विजेतेपदानंतर टीम इंडिया आता आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सज्ज.
  • पहिली मालिका: ६ जूनपासून न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याने सुरुवात.
  • विदेशी दौरे: आयर्लंड, इंग्लंड, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि न्यूझीलंडचा दौरा करणार टीम इंडिया.
  • विशेष आकर्षण: सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games) भारतीय संघ सहभागी होणार.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 02-06-2026