Ratnagiri : स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात रत्नागिरी प्रथम, माखजनचा द्वितीय क्रमांक

रत्नागिरी :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ स्पर्धेत प्रादेशिक स्तरावर रत्नागिरी विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. City & Local Guides

रत्नागिरी नवीन बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला असून माखजन बसस्थानकाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विजेत्या बसस्थानकांचा मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात गौरव करण्यात आला. ब्रेकिंग न्यूज अलर्ट

सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक बसस्थानक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील बसस्थानकांमध्ये हे अभियान वर्षभर राबवले होते. या अंतर्गत विविध समित्यांकडून तीन टप्प्यांत बसस्थानकांची पाहणी करण्यात आली.

मुंबईसह विविध विभागांतील निरीक्षण पथकांनी रत्नागिरीसह राज्यातील बसस्थानकांचे स्वच्छता, देखभाल, प्रवासी सुविधा आणि परिसर व्यवस्थापन यांसारख्या निकषांवर मूल्यमापन केले. या तिन्ही सर्वेक्षणांमध्ये रत्नागिरी नवीन बसस्थानकाने उत्कृष्ट कामगिरी करत ‘अ’ मानांकन प्राप्त केले.

अंतिम गुणांकनानंतर एसटी महामंडळाच्या मुंबई प्रदेश नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या निकालात रत्नागिरी विभागातील रत्नागिरी नवीन बसस्थानकाने प्रतिष्ठेच्या ‘अ’ गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर माखजन बसस्थानकाने द्वितीय क्रमांक मिळवला.

स्वच्छ बसस्थानकात प्रादेशिक विभागातून रत्नागिरी नवीन बसस्थानकास अ मानांकन, तर माखजन बसस्थानकास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ही आनंदाची बाब असून यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे अभिनंदन.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 03-06-2026