आजचे राशिभविष्य, ०८ जून २०२६

today Daily Horoscope

मेष: आज मित्रांच्या सहवासात आपण आनंदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील.

संततीकडून फायदा होईल. निसर्गरम्य ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखाल. सरकारी कामात यशस्वी व्हाल.

वृषभ: नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. सरकारी लाभ मिळू शकतील.

मिथुन: आज प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी – व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिकदृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकांरोबर वाद – विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.

कर्क: आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय लाभदायी होणार नाहीत. सरकारविरोधी कारवायांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.

सिंह: आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या-फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक व सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.

कन्या: आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती-सुखाचे वातावरण मनाला प्रसन्नता देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. नोकरीत फायदा होईल. आपल्या हाताखालचे कर्मचारी व सहकारी यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तूळ: आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका.

वृश्चिक: आज शारीरिक व मानसिकदृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. जमीन, वाहन इत्यादींच्या खरेदीपत्राबद्दल सावध राहा.

धनु: आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आप्तेष्ट व मित्रांच्या आगमनामुळे आपणाला आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. नशिबाची साथ लाभेल.

मकर: आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर बाजारात पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.

कुंभ: आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आज आपणाला गूढ शक्तीचा प्रभाव जाणवेल. नकारात्मक विचार दूर ठेवल्याने लाभ होईल.

मीन: आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट-कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. वाणीतील असंयम भांडणे निर्माण करील. झटपट लाभ मिळविण्याची लालसा महागात पडेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:50 08-06-2026