मसिहा फाउंडेशन पुरस्कृत रक्तदान शिबीराला अद्भुत प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या नेतृत्वाखाली मसिहा फाउंडेशन पुरस्कृत आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे विक्रमवीर म्हणून ओळख असलेले जकी खान यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर आणि परिसरातील युवकांनी तसेच महिला यांनी स्वेच्छेने रक्तदान करुन अद्भुत प्रतिसाद दिला. या शिबीरात 166 रक्तदात्यानी स्वेच्छेने रक्तदान करुन जकी खान यांच्या सामाजिक कार्याला हातभार लावला.

जकीखान हे सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असतात, मसिहा फाउंडेशन यांचे वतीने गोर गरीब गरजू लोकांना सतत मदतीचा हात देतात, सध्या रक्ताचा पुरवठा कमी असल्याने आणि रुग्णाची सख्या वाढत असल्यामुळे जकी खान यांच्यावाढदिवसाचे औचित्य साधून मसिहा फाउंडेशन यांनी हे महत्वाचे कार्य करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जकी खान आणि दोन सघटना यांच्या या कार्याचे कौतुक सर्व थरातून होत आहे. यावेळी मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल रत्नागिरी यांचे सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या सख्येने उपस्थित होते, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात या शिबिराचे शिस्तबध्द नियोजन करण्यात आले होते.

या शिबीरास रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक, रक्तपेढी मधील सर्व सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले याबद्दल मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल यांचे वतीने या सर्वांचे तसेच सर्व रक्तदात्याचे आभार मानण्यात आले.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:04 08-06-2026