आ. रविंद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून महापुरुष मंदिराला पत्र्याच्या शेडची भेट

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावातील बंडबेवाडी येथील महापुरुष मंदिरासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या स्वनिधीतून पत्र्याच्या शेडचे काम पूर्ण करण्यात आले या कामामुळे मंदिर परिसराला आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापुरुष मंदिरासाठी पत्र्याच्या शेडची आवश्यकता लक्षात घेऊन *भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच भाजपा रत्नागिरी दक्षिण मंडळ अध्यक्ष दादा दळी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे* यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून रवींद्र चव्हाण साहेबांकडे मागणी मांडली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर होऊन पूर्णत्वास गेले.

या निमित्त आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले. साहेब कार्यक्रमास उपस्थित नसल्याने त्यांचा सत्कार सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि परशुराम (दादा) ढेकणे यांनी त्यांच्या वतीने स्वीकारला.

यावेळी ग्रामस्थांनी रवींद्र चव्हाण साहेब सौ. वर्षा ढेकणे आणि दादा ढेकणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. मंदिरासाठी आवश्यक असलेली ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाच्या विकासाला नेहमीच गती मिळत असते अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Khabardar diwali fest

महापुरुष मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या या पत्र्याच्या शेडमुळे भाविकांना धार्मिक कार्यक्रम उत्सव व इतर सामाजिक उपक्रमांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली असून गावकऱ्यांनी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 09-06-2026