Today Daily Horoscope:
मेष: आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल.
आर्थिक देवाण – घेवाण करताना सावध राहावे. गूढ विषयांकडे कल होईल. लोभाच्या लालसेपासून दूर राहा. निर्णयशक्तीच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.
वृषभ: आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आजचा संपूर्ण दिवस उल्हास व प्रसन्नतेने भरलेला असेल.
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान – मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनांकडून भेटवस्तू मिळतील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.
कर्क: आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
सिंह: आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान – प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. उत्तम भोजन, वस्त्रालंकार व वाहनप्राप्ती होईल.
तूळ: आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. चांगल्या बातम्या येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सहकारी व हाताखालचे नोकर यांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक: आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र – मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धनलाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
धनु: आज शक्यतो प्रवास टाळावा. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. तार्किक व बौद्धिक चर्चेपासून शक्यतो दूर राहा.
मकर: आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. मनःस्ताप व प्रतिकूल वातावरणामुळे दिवस कटकटीचा जाईल.
कुंभ: मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोट्या प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
मीन: आनंद, उत्साह व प्रसन्न तन – मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. प्रवास होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 10-06-2026














