परीक्षा काळातील ताणतणाव आणि शंकांचे निरसन करण्यासाठी समुपदेशन सुविधा; विभागीय सचिव पुनिता गुरव यांचे आवाहन
रत्नागिरी: Konkan Board Supplementary Exam Helpline | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष हेल्पलाइन व समुपदेशन (Counselling) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, ताणतणाव, शंका आणि इतर अडीअडचणी सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
१६ जूनपासून परीक्षेला होणार सुरुवात
कोकण विभागीय मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. तर इयत्ता १० वीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत घेतली जाईल.
८ जूनपासून समुपदेशन सेवा कार्यान्वित
विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये किंवा कोणत्याही प्रकारची मानसिक अडचण येऊ नये, यासाठी ८ जूनपासूनच ही समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा परीक्षा संपेपर्यंत अविरतपणे सुरू राहणार आहे. या विशेष सुविधेचा विद्यार्थी आणि पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.
मदतीसाठी या समुपदेशकांशी साधा संपर्क:
परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा शंका निरसनासाठी शिक्षण मंडळाने अधिकृत समुपदेशकांची नियुक्ती केली असून, पालक व विद्यार्थी खालील क्रमांकांवर थेट संपर्क साधू शकतात:
- संदीप दत्ताराम शिर्के: ९५५२०६४६४०
- भाग्यविधाता भास्कर वारंग: ९४२३२१३२४०
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 13-06-2026














