वर्ल्ड योगासन चॅम्पियन तन्वी रेडीजचा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे सत्कार

खेड – (प्रतिनिधी):

दिनांक 4 ते 8 जून 2026 दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कु. तन्वी रेडीज हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.
या जागतिक स्पर्धेत 75 हून अधिक देशांतील 500 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

भारताने या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशा एकूण 114 पदकांची कमाई करून पदतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

सिनिअर गटातील वैयक्तिक प्रकारात तन्वीने सुवर्णपदक जिंकत भारताचा गौरव वाढवला. तसेच सांघिक प्रकारातही भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.

Gadre3

तन्वी रेडीज हिने देशासाठी केलेल्या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरीची दखल घेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलतर्फे तिला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे चेअरमन श्री. बिपीन पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी तन्वीचे अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 13-06-2026