मेष – आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल.
वृषभ – महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल.
मिथुन – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
कर्क – आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात.
सिंह – आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार – व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल.
कन्या – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी – व्यवसायात कामाचा व्याप वाढेल.
तूळ – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील.
वृश्चिक – आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल.
धनु – आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील.
मकर – आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही.
कुंभ – आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल.
मीन – आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 15-06-2026














