मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्यामार्फत सहकारी संस्था मधील सेवकाकरिता घेण्यात येणारी डीसीएम ची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 सहकार प्रशिक्षण केंद्रामध्ये घेण्यात येणार आहे सदरची परीक्षा कोल्हापूर येथील तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र मार्केट यार्ड कोल्हापूर येथे शनिवार दिनांक २०/६/ २०२६ पासून ते सोमवार दिनांक 22 /6 /2026 पर्यंत या तिन्ही दिवशी घेण्यात येणार आहे.
कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये नोकरी करण्यासाठी सदरचा कोर्स पास होणे आवश्यक आहे सदर परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी २ ते ५ या वेळेत दररोज दोन पेपर घेण्यात येणार आहेत विषय १) सहकार २) सहकार कायदा व संबंधित कायदे ३) वित्तीय हिशेब लेखन व हिशेब तपासणी ४) सहकारी व्यवस्थापन ५) सहकारी पतपुरवठा व बँकिंग ६) संगणक वापर परिचय व व्यावहारिक शिक्षण असे विषय आहेत.
या परीक्षेला कोल्हापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील 68 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरवर्षी जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर अशा वर्षातून दोन परीक्षा घेण्यात येतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 18-06-2026














