रत्नागिरी नगरपालिका प्रभाग 5 मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्यातर्फे रेनकोट वाटप

रत्नागिरी : प्रभागातील नाले,रस्ते,वहाळ तसेच ऊन-पावसात सातत्याने साफसफाई करणाऱ्या रत्नागिरी नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्या कडून रेनकोटचे वाटप करण्यात आले.

पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम करत हा उपक्रम राबविण्यात आला. या कर्मचाऱ्यांमुळे प्रभाग स्वच्छ व आरोग्यदायी राहण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी सौरभ मलुष्टे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 30-06-2026

Ratnagiri Khabardar add image