Ratnagiri Rainfall Record: दापोलीत विक्रमी ३०४ मिमी पाऊस!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर कायम असून, विशेषतः उत्तरेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ६ जुलै रोजी सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये दापोली तालुक्यात विक्रमी ३०४ मिलिमीटर पावसाची अभूतपूर्व नोंद झाली आहे.

Ratnagiri Rainfall Record: २४ तासांतील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाची तालुकानिहाय अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • दापोली: ३०४ मिलिमीटर (विक्रमी पाऊस)
  • मंडणगड: २५९ मिलिमीटर
  • खेड: २१३ मिलिमीटर
  • चिपळूण: १७५ मिलिमीटर
  • राजापूर: ११७ मिलिमीटर
  • गुहागर: ९७ मिलिमीटर
  • लांजा: ९३ मिलिमीटर
  • संगमेश्वर: ८२ मिलिमीटर
  • रत्नागिरी: ६६ मिलिमीटर

जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवर; वाशिष्टीला दिलासा

नद्यांच्या पाणीपातळीचा विचार केला तर, खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी कालच्या तुलनेत किंचित कमी झाली असली, तरी ती अद्यापही धोक्याच्या पातळीच्या खूप वरून वाहत आहे. दुसरीकडे, चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आल्याने चिपळूणकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणीपातळीत कालच्या तुलनेत वाढ झाली असली, तरी कोणत्याही नदीने अद्याप इशारा पातळी ओलांडलेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 07-07-2026