नीट पेपरफुटीविरोधातील २६ दिवसांच्या उपोषणानंतर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर वांगचुक यांनी व्यक्त केला तीव्र संताप; “माझं ११ किलो वजन कमी झालं, मला आता चारित्र्य प्रमाणपत्राची गरज नाही”
Sonam Wangchuk Hunger Strike प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटीविरोधात (NEET Protest) सलग २६ दिवस उपोषण (Hunger Strike) करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणारा एक भावूक आणि आक्रमक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या उपोषणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आणि ट्रोलर्सना जोरदार सवाल विचारले आहेत.
Sonam Wangchuk Hunger Strike: “२६ दिवसांच्या त्यागावर प्रश्न का?”
प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक अत्यंत भावूक आणि संतापलेल्या अवस्थेत दिसत आहेत. ते म्हणाले, “२६ दिवसांच्या उपोषणानंतर मला नक्की काय सिद्ध करायचे आहे? मी उपोषण सोडल्याबद्दल माझ्यावर इतके प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? इतक्या दिवसांच्या पवित्र आंदोलनानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारशी तडजोडच करायची असती, तर २६ दिवस सलग उपोषण करण्याचे काही कारणच उरले नसते.”
११ किलो वजन घटले, थंडी-उन्हाचा सामना; वांगचुक यांनी मांडली व्यथा
आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा पाढा वाचताना वांगचुक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी त्यांना जमिनीवर झोपावे लागले, शारीरिक त्रास सहन करावा लागला. उपोषणाच्या २०व्या आणि २२व्या दिवशी स्वतःला सावरण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागली.
“या आंदोलनात माझे ११ किलो वजन कमी झाले आहे. लडाखच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दिल्लीच्या कडक उन्हापर्यंत मी हे पवित्र उपोषण केले. तरीही मी काय गमावले हे सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्या चारित्र्य प्रमाणपत्राची (Character Certificate) अजिबात गरज नाही,” असा घणाघाती सवाल त्यांनी उपस्थित केला.
उपोषण सोडण्यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम
उपोषण नेमके कोणाच्या हाताने सोडले यावरून होणाऱ्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, “मी उपोषण सोडले तर कोणासोबत सोडले? केंद्रीय मंत्र्यांच्या हाताने का सोडले? दुसऱ्या कोणाकडून का नाही सोडले? काय सौदा झाला? अशा प्रकारचे प्रश्न कालपासून लोक मला फोन करून आणि पोस्ट दाखवून विचारत आहेत. कालपासून मी फक्त द्रव पदार्थ घेत असल्याने मला थोडी ऊर्जा मिळाली आहे, पण या प्रश्नांमुळे मला प्रचंड धक्का, दुःख आणि राग आला आहे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 25-07-2026














